Close

  परिचय

  प्रस्तावना

  सामान्य प्रशासन विभाग हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्वपूर्ण विभाग असून त्यात सर्वसाधारण उप विभाग, सामाजिक विकास समन्वय, उप विभाग, असे उप विभाग आहेत. सदर उप विभागाच्या अंतर्गत राजशिष्टाचार, रचना व कार्यपध्दती, विशेष प्रकल्प (मुंबई विकास व सुवर्ण त्रिकोण ), विशेष चौकशी व माहिती तंत्रज्ञान हे विषय समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त केंद्रीय निर्वाचन आयोगाच्या अधिपत्याखालील “राज्यातील निवडणुका ” यासाठी एक स्वतंत्र व्यवस्थाही कार्यरत आहे . या विभागाशी संबंधित असणाऱ्या सेवा तात्परतेने, सौजन्यपूर्वक व सम्मानपूर्वक नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी हा विभाग बांधील राहील.

  सामान्य प्रशासन विभागाची रचना

  मा. मुख्यमंत्री हे सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी मंत्री असून मा.राज्यमंत्री यांचे अधिपत्याखाली मा.मुख्य सचिवांसह, अपर मुख्य सचिव (सेवा ) व अन्य ७ अपर मुख्य सचिव , प्रधान सचिव / सचिव हे वरिष्ठ प्रशासकीय अवधकारी आहेत. या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे एकूण ६० कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी करण्यात आलेली आहे

  नियम / शासन निर्णय

  या विभागाशी संबंधित नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. या विभागाकडू न वेळवेळी निर्गमित होणाऱ्या नियम तथा शासन निर्णयाबाबतची माहिती www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर अद्यावत करण्यात येते.