



विभागाविषयी
सामान्य प्रशासन विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा विभाग आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी जसे नियुक्ती, पदोन्नती, अनुकंपा तसेच आरक्षण यासंदर्भात धोरण तयार करणे, प्रशिक्षण धोरण ठरविणे व राबविणे, मंत्रालयीन संवर्गांचे संनियंत्रण करणे तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचे संनियंत्रण या विभागामार्फत केले जाते. या विभागांतर्गत मा.मुख्यमंत्री कार्यालय तसेच मा.मुख्य सचिव कार्यालय यांच्या संदर्भातील कामकाज पाहिले जाते. या विभागांतर्गत राजभवन आस्थापना, लोकआयुक्त व उप लोकायुक्त या कार्यालयांची आस्थापना, लोकसेवाहक्क आयोग यांची आस्थापना, निवडणुक शाखा, राजशिष्टाचार, रचना व कार्यपद्धती, गट अ व ब अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीविषयक कामकाज व प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, मंत्री आस्थापना, शासकीय निवासस्थानांचे वाटप, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांची आस्थापना, विमानतळांचे संनियंत्रण व माजी सैनिक व स्वातंत्र सैनिक कल्याण कक्ष इत्यादि उपविभाग कार्यरत आहेत. वरील सर्व विषयांचे कामकाज पहाण्याकरिता सामान्य प्रशासन विभागात एकूण नऊ सचिव स्तरीय अधिकारी, एकूण एकोणीस सह/उपसचिव, एकोणचाळीस अवर सचिव तसेच ९५ कक्ष अधिकारी कार्यरत आहेत. .
अधिक वाचा