बंद करा

    १०० दिवस कार्यक्रम अहवाल

    100 दिवस कार्यक्रमाची सद्य:स्थिती निहाय माहिती – सामान्य प्रशासन विभाग – विमानचालन
    अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण/अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतीची माहिती व शासन निर्णय/फोटो/इ. अभिलेख किंवा त्याची लिंक अपूर्ण असल्यास सद्य:स्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची काल मर्यादा
    1 नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून अमरावती विमानतळाकरीता परवाना (लायसन्स) प्राप्त करणे. कार्यवाही पूर्ण नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून अमरावती विमानतळासाठी परवाना (लायसन्स) दि.10.03.2025 रोजी प्राप्त झाला आहे. [पीडीएफ – 1 एमबी]
    2 अमरावती विमानतळावरून उडाण योजनेअंतर्गत प्रवाशांकरीता विमानसेवा सुरु करणे. कार्यवाही पूर्ण अमरावती विमानतळावरून उडाण योजनेअंतर्गत प्रवाशांकरीता दि.16.04.2025 पासून विमानसेवा सुरु करण्यात आली आहे[पीडीएफ – 191 केबी]
    3 गडचिरोली विमानतळ सुरु करण्याकरीता भूसंपादनाच्या कामाची सुरुवात करणे. कार्यवाही पूर्ण गडचिरोली विमानतळ सुरू करण्याकरीता भूसंपादन संदर्भात दि. 03.04.2025 रोजी स्थानिक पातळीवर जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.[पीडीएफ – 9 एमबी]
    4 कोल्हापूर विमानतळाकरीता आवश्यक जमीन भारतीय विमानपत्तन ‍ प्राधीकरण (एएआय) यांना हस्तांतरीत करणे. कार्यवाही पूर्ण कोल्हापूर‍ विमानतळाकरीता आवश्यक जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे नावे करुन त्यांचे नाव 7/12 वर मालकी हक्कात नोंदविण्यात आलेले आहेत.
    5 शिर्डी विमानतळाकरीता नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारतीचे (एनआयटीबी) बांधकाम सुरू करणे. कार्यवाही पूर्ण शिर्डी विमानतळाकरीता नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू करण्‍यात आले आहे.[पीडीएफ – 1 एमबी]
    6 शिर्डी विमानतळाकरीता 500 पॅक्स आसन क्षमतेसह विद्यमान टर्मिनल इमारतीचे नुतनीकरण करणे कार्यवाही पूर्ण शिर्डी विमानतळाकरीता 500 पॅक्स आसन क्षमतेसह विद्यमान इमारतीचे काम पूर्ण करुन विस्तारीत इमारत प्रवाशांकरिता खुली करण्यात आली आहे.[पीडीएफ – 1 एमबी]
    7 शिर्डी विमानतळाकरीता एकापेक्षा अधिक एटीएफ च्या सुविधेची निर्मिती करिता करार करणे. कार्यवाही पूर्ण एटीएफ च सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत.[पीडीएफ – 4 एमबी]
    8 रत्नागिरी विमानतळाकरीता पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग (पीटीबी) च्या बांधकामाचे कार्यादेश जारी करुन बांधकाम प्रगतीपथावर करणे कार्यवाही पूर्ण टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 25% काम पूर्ण झाले आहे.[पीडीएफ – 182 केबी]
    9 रत्नागिरी विमानतळाकरीता आर्किटेक्चरल योजना चे अंतिमीकरण/मंजुरी देऊन जमीनीवरील प्रत्यक्ष कामाची सुरुवात करुन 10 टक्के काम प्रगतीपथावर करणे कार्यवाही पूर्ण टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 25% काम पूर्ण झाले आहे.[पीडीएफ – 182 केबी]
    10 रत्नागिरी विमानतळाकरीता परिघीय क्षेत्रातील चार्टड विमान मालकांशी संपर्क साधणे आणि हँगरमध्ये विमान पार्क करण्यासाठी करार करण्याची प्रक्रीया सुरू करणे. कार्यवाही पूर्ण रत्नागिरी येथील गर्दे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि या उद्योग समुहासमवेत बैठक घेऊन दि. 06.03.2025 रोजी त्यांचे सदर कंपनीच्या मालकीच्या विमानासाठी 11 X15 X 45 या आकाराचा तयार हँगर उपलब्ध व्हावा यासाठी विनंतीपत्र प्राप्त झाले आहे.[पीडीएफ – 665 केबी]
    11 नागपूर विमानतळाच्या 786 हेक्टर जमिनीपैकी पहिल्या टप्प्यात एमआयएल यांना हस्तांतरीत करावयाच्या जमीनीचा भाडेपट्टा करारनामा करणे व कामास गती देणे. कार्यवाही पूर्ण पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. व मिहान इंडिया लि. यांचेमध्ये 747.78 हेक्टर जमिनीचा भाडेपट्टा करारनामा दिनांक 16/04/2025 रोजी करण्यात आला आहे.[पीडीएफ – 665 केबी]
    12 नागपूर प्रोजेक्ट : खापरी येथील सेक्टर 26/पी आणि 29/पी येथील भूखंड प्रकल्पग्रस्तांना (PAPs) हस्तांतरीत करणे. कार्यवाही पूर्ण खापरी (रेल्वे) गावठाणातील पात्र प्रकल्पग्रस्तांची अंतिम यादी दिनांक 11/03/2025 रोजी प्रसिध्द करुन पात्र प्रकल्पग्रस्तांना उपविभागीय अधिकारी, नागपूर (ग्रामिण) या कार्यालयातर्फे दिनांक 09/04/2025 ते 11/04/2025 रोजी भूखंड वाटप करण्यात आले आहे.
    13 नागपूर प्रोजेक्ट: खापरी पुनर्वसन क्षेत्रातील शाळेची इमारत (तळमजला फक्त) जिल्हा परिषद नागपूर यांचेकडे सुपूर्द करणे कार्यवाही पूर्ण खापरी (रेल्वे) येथील पुनर्वसन क्षेत्रातील शाळेची इमारत दिनांक 23/01/2025 रोजी जिल्हा परिषद, नागपूर यांना हस्तांतरीत करण्यात आली आहे. (हस्तांतरण प्रत संलग्न)
    14 नागपूर प्रोजेक्ट: 30 एकर सेझ जमीन व्यवसाय विस्ताराकरीता (नवीन घटक आणि असेंम्ब्ली उत्पादन) टाटा ॲडव्हान्स सिस्टम लि. यांना वितरण करणे. कार्यवाही पूर्ण टाटा ॲडव्हान्स सिस्टम लि. यांना 30 एकर क्षेत्राचा भूखंड महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे दिनांक 27/02/2025 रोजी वितरीत करण्यात आला आहे. (प्रत संलग्न)
    15 नागपूर प्रोजेक्ट: हाय टेक डिफेन्स उत्पादनांच्या निर्मितीसाठी जेएसआर डायनॅमिक्स यांना सेझ मधील 5 एकर जमीनीचे वितरण करणे कार्यवाही पूर्ण जेएसआर डायनॅमिक्स यांना सेझ मधील 5 एकर क्षेत्राचा भूखंड महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे दिनांक 07/03/2025 रोजी वितरीत करण्यात आला आहे. (प्रत संलग्न)
    16 नागपूर प्रोजेक्ट: टीएएसएल (टाटा अडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड) चे टी2 (टाइप २) पुरवठादार असलेल्या सैनी इंजिनिअरींगला सेझ मधील 10 एकर जमीनीचे वितरण करणे. कार्यवाही पूर्ण सैनी इंजिनिअरींग यांना दिनांक 15/04/2025 रोजी भूखंड वितरीत करण्यात आला आहे. (प्रत संलग्न)
    17 नागपूर प्रोजेक्ट: विमान निर्मिती आणि एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती) उद्योगांना आकर्षित करण्यासाठी 1400 मीटर लांबीच्या लिंक टॅक्सीवे च्या बांधकामासाठी निविदा काढणे. कार्यवाही पूर्ण सदर बांधकामासाठी प्रकल्प सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी दिनांक 14/02/2025 रोजी निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.
    18 सोलापूर (होटगी) विमानतळावरुन उडाण योजनेअंतर्गत विमानसेवा सुरु करणे व त्याकरीता राज्य शासनामार्फत 100 टक्के व्यवहार्यता तफावत निधी योजना अंतीम करणे. कार्यवाही प्रगतीत विमानसेवा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याकरीता व्यवहार्यता तफावत निधी योजना अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे.[पीडीएफ – 677 केबी]
    19 कराड विमानतळाचे विस्तारीकरण करणे. कार्यवाही प्रगतीत कराड विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात येणारे अडथळे दूर करण्याच्या शक्यतेबाबत स्वंतत्रपणे सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे.[पीडीएफ – 742 केबी]
    एकूण एकूण संख्या-19 एकुण पुर्ण कामांची संख्या-17 एकूण अपूर्ण कामाची संख्या-02